बिरसा फायटर्सनी केले रक्तदान

बिरसा फायटर्सनी केले रक्तदान



शिरपूर: देशात कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शिरपूर तालुका जि. धुळे लौकी येथील शासकीय पोस्ट बेसिक आश्रमशाळेत लोकमत आणि बिरसा फायटर्सच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर दिनांक ११ जुलै २०२१ रोजी  ऊत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. आलेल्या टीमने रक्तदात्यांना चांगल्या पद्धतीने उद्बोधन केले. यावेळी जवळपास २७जणांनी रक्तदान केले. दरम्यान कोणत्याही क्षणी रक्त लागल्यास ते देण्याचे आश्वासन रक्त संकलनाचे प्रमुख मनोज माळी यांनी बिरसा फायटर्सला दिले.
          यावेळी बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा, लोकमत समूहाचे तालुका प्रतिनिधी सुनिल साळुंखे, नाशिक विभाग अध्यक्ष विलास पावरा, धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, जिल्हा कार्याध्यक्ष साहेबराव पावरा, उपाध्यक्ष समाधान ठाकरे, सखाराम पावरा, सल्लागार संजय खैरनार,  संघटक काकड्या पावरा, छन्ना पावरा, दिलीप पावरा, मुख्याध्यापक एम. जी. भामरे. बिरसा फायटर्सचे शिरपूर तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे, तालुका सचिव गेंद्या पावरा, सल्लागार रवी पावरा, सागर मोरे, युवा प्रतिनिधि मद्रास पावरा, दिनेश पावरा, रघू मोरे, रोयदास सोनवणे, हिरालाल सोनवणे, विकास पावरा आदी उपस्थित होते.
         सर्व रक्तदात्यांचे बिरसा फायटर्सचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा,राज्याध्यक्ष राजेश धुर्वे,महासचिव राजेंद्र पाडवी,महानिरीक्षक केशव पवार,कोषाध्यक्ष दादाजी बागूल,राज्य प्रवक्ता रोहित पावरा,कार्याध्यक्ष नंदलाल पाडवी इत्यादी पदाधिकारी यांनी कौतुक करत आभार मानले आहेत. तसेच  'लोकमत' समुहने सुद्धा बिरसा फायटर्स संघटनेचे आभार मानले आहेत.