इंधन दर वाढीचा भडका ; पेट्रोल-डिझेलबाबत कंपन्यांनी घेतला ‘हा’ निर्णय
मुंबई : जागतिक कमॉडिटी बाजारात पुन्हा एकदा कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ दिसून आली आहे. तेलाचा दर वाढला असताना पेट्रोलियम कंपन्यांनी मात्र आज इंधन दरवाढीला विश्रांती दिली आहे. आज बुधवारी पेट्रोल आणि डिझेल दर जैसे थेच आहेत. त्यापूर्वी काल पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल २८ पैशांनी महागले होते तर सोमवारी इंधन दर स्थिर होते.
आज बुधवारी मुंबईत एक लीटर पेट्रोलचा भाव १०४.९० रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल ९८.८१ रुपये आहे. चेन्नईत पेट्रोलचा ९९.८० रुपये इतका भाव आहे. तर कोलकात्यात एक लीटर पेट्रोल ९८.६४ रुपये आहे. भोपाळमध्ये साध्या पेट्रोलचा भाव १०७.०७ रुपये झाला आहे