क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त मारेगावात विनम्र अभिवादन
पंकज नेहारे
मारेगाव :क्रांतीसूर्य बिरसा मुंडा यांच्या पुण्यतिथी निमित्त आज ९ जुन रोजी मार्डी चौक येथे क्रांतीसुर्य बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राला हार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. आले.यावेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे मारेगाव तालुका अध्यक्ष सुमित सुनिलराव गेडाम, उपाध्यक्ष राजु सिडाम, उपाध्यक्ष गंगाधर लोणसावळे (महाराज), कार्याध्यक्ष भैय्या जी कन्नाके, सचिव शंकर मडावी, बळवंत कोवे, सोनू गेडाम, भाऊराव मेश्राम, आकाश कन्नाके, प्रदिप मेश्राम मनोज पेंदोर, आकाश जुमनाके, इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते.
बिरसा मुंडा यांचा जन्म १५ नोव्हेंबर १८७५ मध्ये झारखंड येथील उलहातू येथे झाला.बिरसा मुंडा यांनी आपल्या सहका-यांच्या मदतीने १८९५ मध्ये छोटा नागपूर येथे इंग्रजांविरोधात मोठा लढा सुरू केला.इंग्रजांनी त्यांना पकडले व तुरूंगात टाकले. इंग्रजांनी बिरसा मुंडा यांचा खूप छळ केला. ९जून १९०० रोजी बिरसा मुंडा यांचा रांची येथील तुरुंगात त्यांचा मृत्यू झाला.
बिरसा मुंडा हे आदिवासी समाजाचे दैवत समजले जाते. जननायक ही पदवी लोकांनी त्यांना बहाल केली. जननायक बिरसा मुंडा,भगवान बिरसा मुंडा,क्रांतीसूर्य बिरसा मुंडा,धरतीआबा इत्यादी नावाने लोक त्यांना ओळखू लागले. बिरसा मुंडा यांचे कार्य देशासाठी व आदिवासी समाजासाठी प्रेरणा दायी होते. आदिवासी समाज त्यांचा आदर्श घेऊन कार्य करत असतो सुद्धा बिरसा मुंडा यांच्य, याचा आम्हाला अभिमान वाटतो.बिरसा मुंडा यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्हाला आदिवासी समाजात क्रांतीकारी कार्य करायचे आहे. असे मनोगत तालुका अध्यक्ष सुमित गेडाम यांनी व्यक्त केले.
भगवान बिरसा मुंडा की जय! बिरसा मुंडा अमर रहे! इत्यादी घोषणा यावेळी देण्यात आल्या.