दहा हजार देवूनही मटण व दारुची पार्टी मागणारे मंडळधिकारी व तलाठी एसीबीच्या जाळ्यात

दहा हजार देवूनही मटण व दारुची पार्टी मागणारे मंडळधिकारी व तलाठी एसीबीच्या जाळ्यात

खामगाव तालुक्यातील  शिरला नेमाने  येथील ४२वर्षीय तक्रारदाराने बुलढाणा एसीबीच्या तक्रार दिली होती.लखनवाडा येथे कार्यरत  असलेले मंडळधिकारी  विलास साहेबराव खेडेकर वय वर्षे ५२रा गजानन काँलनी खामगाव व शिरुर नमाने येथील तलाठी बाबुराव मोरे वय वर्ष ३५ रा किन्ही महादेव खामगाव यांना
 मटणावर व दारूवर ताव मारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ  तक्रारदाराच्या  भावाच्या प्लाँटाची नोंद सातबाऱ्यावर घेण्यासाठी व फेरफार नकल देण्यासाठी साठी या आधी दहा हजार रुपये दिले होते.या तक्रार वरून बुलढाणा एसीबीने ट्रँप लावून खामगाव तालुक्यातील प्रिपरी  देशमुख शिवारात प्रल्हाद चव्हाण याच्या शेतातील झोपडी समोर मंडळधिकारी व तलाठी  या दोघांना मटणावर ताव मारताना रंगेहाथ पकडले आहे. ही कारवाई बुलढाणा एसीबीच्या पथकाने केली आहे.