कोंबडा बाजार वर पोलिसांचा छापा
तालुक्यातील मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्याघोंसा येथे लपून छपून कोंबडा बाजार भरवीत असल्याची गुप्त माहिती ठाणेदार अजित जाधव यांना मिळाली.यावरून १६ नोव्हेंबर ला सकाळी ठाणेदार अजित जाधव यांनी पोकिस कर्मचारी यांनी धाड टाकण्यास सांगितले.मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस कर्मचारी यांनी घोंसा गावातील गजानन महाराज मंदीराच्या पाठीमागे आंब्याच्या झाडा जवळ सार्वजनिक ठिकाणी कोंबड बाजार भरलेला आढळला व कोंबड्यावर झुंजी लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन हार जितचा जुगार खेळ खेळवित असल्यााचे दिसले. पोलिसांनी कोंबड बाजारात पांडुरंग पैकु आत्राम वय ४५ वर्ष रा पाचपोर , अनिल बापुराव कुमरे वय ३० वर्ष रा पाचपोर ,भिमराव सुर्यभान टेकाम वय ६० वर्ष रा. मजरा हे कोंबड्याची झुंज लावुन त्यावर पैशाची बाजी लावुन कोंबडबाजार नावाचा जुगार खेळ खेळवित असतांना मिळुन आले. त्यांच्या ताब्यात दोन जिवंत कोबंडे किमंत ५ हजार ५०० एक मरण पावलेला कोंबडा किं १५०० व दोन लोखंडी धारदार कात्या किंमत २०० नगदी ५ हजार १२० असा एकुण १२ हजार ३२० चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी विरुध्द कलम १२ (ब) मुंबई जुगार कायद्यान्वये कार्यवाही करण्यात आली. सदरची कार्यवाही ठाणेदार अजित जाधव यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नेवारे , अनिल सकवान, खुशाल सुरपाम, अशौक नैताम, दिलीप जाधव, संदीप कुमरे, संजय खांडेकर, संदीप बोरकर यांनी केली