आधी उद्वाटन मग टेस्ट ड्रायव्हिंग , आमदार राजू भाऊ तोडसाम बनले बसचालक
वाजीद कुरेशी पांढरकवडा
पांढरकवडा : महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री मा_श्री_प्रतापरावजी_सरनाईक यांच्याकडे मा. आमदार राजूभाऊ तोडसाम यांनी वेळोवेळी पाठपुरावा करत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नवीन दहा जिजाउ बसेससाठी मागणी केली होती, त्यापैकी पांढरकवडा आगारालसाठी नवीन ५ बसेस प्रवाशांच्या सेवेकरिता मिळाल्याने त्यांची भव्य मोठ्या थाटा- माटात उत्साहात लोकार्पण सोहळा पार पडला.
मतदारसंघातील ग्रामीण आणि शहरी भागातील शाळा, कॉलेज मधील विद्यार्थी तसेच वयोवृद्ध नागरिकांची गैरसोय होऊ नये, सर्वसामान्य नागरिकांचा प्रवास सक्षम व आरामदायक करण्यासाठी नवीन बसची मागणी केली. या मागणीची दखल घेऊन मंत्री महोदय यांनी तात्काळ दहा बसेस देण्याचा निर्णय घेतला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यात पाच बसेस दिल्या आणि उर्वरित पाच बसेस पुढील टप्प्यात देणार असल्याचे सांगितले नवीन जिजाऊ बसेस दिल्याबद्दल आगारातील आगार व्यवस्थापक आशिष काकडे,आगार वाहतूक निरीक्षक पेदोर व अधिकारी-कर्मचारी यांनी जाहीर सत्कार करून आभार मानले या लोकार्पण सोहळा निमित्त पांढरकवडा नगरीचे लोकप्रिय नगराध्यक्ष आतिश बोरेले, नगरसेवक अनिल बोरेले, नगरसेवक रुपेश कुटकलवार, नगरसेवक मंगेश वातीले, ज्येष्ठ पत्रकार दामोदर बाजोरिया, अशोक बेले, जावेद सय्यद,किशोर देशट्टीवर, नारायण भानारकर, अक्षय वातीले, सुरज जाधव, चेतन पडोळे, राम पेगरर्लावार ,धीरज शर्मा,संतोष शेंगर आदि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते
0 Comments