मारेगावात शिवसेनेचे शेतकरी सहाय्यता केंद्र सुरू; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक सरसावले!जिल्हाप्रमुख आशीषभाऊ खुलसंगे व तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या हस्ते उद्घाटन

 मारेगावात शिवसेनेचे शेतकरी सहाय्यता केंद्र सुरू; शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिक सरसावले!

जिल्हाप्रमुख आशीषभाऊ खुलसंगे व तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या हस्ते उद्घाटन

सचिन मेश्राम - मारेगाव 

मारेगाव : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि शेतकऱ्यांसमोर उभ्या राहणाऱ्या विविध शासकीय अडचणी लक्षात घेता, शेतकरी बांधवांना तातडीने मदत व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने मारेगाव येथे शिवसेनेच्या वतीने शेतकरी सहाय्यता केंद्र सुरू करण्यात आले. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना. एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना. संजयभाऊ राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली या केंद्राची स्थापना करण्यात आली.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आशीषभाऊ खुलसंगे आणि मारेगाव तालुकाप्रमुख विशाल किन्हेकर यांच्या हस्ते या शेतकरी सहाय्यता केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देणे, शासकीय कार्यालयांमधील अडचणी सोडविण्यासाठी सहकार्य करणे, आवश्यक कागदपत्रे व योजनांची माहिती देणे तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करणे, ही या केंद्राची प्रमुख उद्दिष्टे आहेत. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शिवसैनिकांनी सदैव तत्पर राहावे, या भावनेतून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशी सहाय्यता केंद्रे सुरू करण्यात येत आहेत.

यावेळी विजय मेश्राम, महिला आघाडीच्या कल्पनाताई गावंडे, प्रतिभाताई झाडे, सुनील गेडाम, संजय आवारी, प्रशांत भंडारी, अनिल राऊत, तुकारामजी माथनकर, रामचंद्र खंडी, शेतकरी भाऊराव ठावरी, आनंदराव मिलमिले, शुभम ठावरी, गोपाल खामनकर, गणेश आसुटकर, जीवन भाऊ डाखरे, विठ्ठल गेडाम, शंकर नागोसे, मोहन भाऊ किन्हेकर, किशोर शेंडे, गणपत वाढाई, प्रवीण बोबडे, सुधाकर आत्राम यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या अडचणीच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी हे सहाय्यता केंद्र महत्त्वपूर्ण दुवा ठरणार आहे.

Post a Comment

0 Comments