मजरा येथे अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडला
महसूल विभागाच्या पथकाची कारवाई; ट्रॅक्टर-ट्रॉली मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा
सचिन मेश्राम - मारेगाव
मारेगाव : तालुक्यातील मौजा मजरा येथे अवैध रेती वाहतूक करताना महसूल विभागाच्या पथकाने ट्रॅक्टर व ट्रॉली पकडून कारवाई केली. MH29CB4465 क्रमांकाचे हे वाहन पुढील कार्यवाहीसाठी मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये जमा करण्यात आले.
मा. उपविभागीय अधिकारी वणी नितीनकुमार हिंगोले व मा. उपविभागीय अधिकारी मारेगाव यतीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार उत्तम निलावाड यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
या पथकात ग्राम महसूल अधिकारी भीमराव धोटे, सन्नी कुडमेथे, शैलेश घरडे तसेच महसूल सेवक गणेश उराडे व अमित यांचा समावेश होता.
सदर ट्रॅक्टरचे मालक पुष्पराज प्रमोद गानफाडे असल्याची माहिती आहे. महसूल विभागाच्या या कारवाईमुळे अवैध रेती वाहतुकीच्या प्रकारांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नांना गती मिळाली आहे.
0 Comments