टाकळी (कुंभा) येथे श्री शिव महापुराण कथा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

टाकळी (कुंभा) येथे श्री शिव महापुराण कथा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

रोहन आदेवार - मारेगाव

मारेगाव: तालूक्यातील टाकळी (कुंभा) येथे राम नवमी ते हनुमान जयंती या शुभ पर्वावर टाकळी (कुंभा) ग्रामस्थांनी भव्य धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यामध्ये श्री शिव महापुराण कथा ६ एप्रिल ते १३ एप्रिल २०२५ या कालावधीत दररोज सायंकाळी ७ ते १० या वेळेत हनुमान मंदिराच्या प्रांगणात पार पडणार आहे.


या निमित्ताने महाप्रसादाचे आयोजन ६ ते १३ एप्रिल दरम्यान सायंकाळी ४ ते ६ या वेळेत करण्यात आले आहे. तसेच, १३ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता दिंडी सोहळा, तर सकाळी ११ वाजता काळा कीर्तन व महाप्रसाद आयोजित करण्यात आला आहे.



या धार्मिक उत्सवात परम पूजनीय आचार्य चंद्रमोहनजी महाराज (वृंदावन धाम) यांचे विशेष मार्गदर्शन लाभणार आहे. तरी सर्व भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मसंस्मरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन टाकळी ग्रामवासी व आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.