हवे होते पैसे म्हणून, चारित्र्यावर संशय अन् घडले विपरीत...
मारेगाव -सचिन मेश्राम
मारेगाव : गोंडबरांडा (ता. मारेगाव) हे माहेर असलेल्या विवाहित महिलेचा सासरच्या लोकांनी एक लाख रुपयांसाठी शारीरीक व मानसिक छळ केला. याप्रकरणी मारेगाव पोलीस स्टेशन येथे सासरच्या सहा जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून परिणामी, हुंड्यासाठी सातत्याने छळ , सोशल मिडीयावरून धमकी आणि बदनामीकारक संदेश पाठवीत मानसिक, आर्थिक व शारीरिक छळ देत असल्याची मारेगाव पोलिसात फिर्यादी संजना हिच्या तक्रारवरून आरोपी पती सतीश श्रीधर सिडाम, सासरा श्रीधर शामराव सिडाम, सासू तारा श्रीधर सिडाम , नणंद पूजा श्रीधर सिडाम , मनीषा पांडुरंग मेश्राम, नम्रता सचिन आत्राम यांचे विरोधात विवाहसंबंधी अपराध, धाकदपट धमकी, सामूहिकरित्या कट रचण्याचा प्रयत्न करण्याचे कलम 85, 352, 351(2), 351 (3), 3 (5) नुसार गुन्हे
दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. याबाबत संजना नामक मुलीशी मारेगाव येथील सतिश श्रीधर सिडाम यांचेशी फेब्रुवारी 2022 रोजी आंतरजातीय विवाह झाला सुरूवातीचे काही दिवस गोड्यागुलाबीने गेल्यानंतर सासर कडील सर्वानीच जातीची ठिकाणी टाकली तू जातीची नसल्याने हुंडा मिळाला नाही त्यामुळे आता तुझ्या माहेरून एक लाख रुपये आण असा तागादा लावला.
संजना चा विवाह 2022 मध्ये सतिश सोबत झाला. लग्नानंतर पतीसह सासू-सासरे माहेरहून एक लाख रुपये आणण्याची मागणी तिच्याकडे करु लागले. संजना पैसे आणत नसल्यान शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करुन शारीरिक व मानसिक छळ करु लागले. त्यामुळे संजना माहेरी आई वडिलांकडे आली.
सासरच्या कडून जीवे मारण्याचा प्रयत्न.
चारित्र्यावर संशय, घरून निघून जाण्याच्या धमक्या व मारहाण, जेवणात फिनाईल द्रव्य टाकून फासावर लटकवित जीवे मारण्याचा प्रयत्न. संजना ही मानसिकदृष्ट्या पूर्णतः खचली होती.
दरम्यान, संजना ने याबाबत मारेगाव न्यायालयात अर्ज दाखल केल्यानंतर तिच्या पतीने तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत संजना ने मारेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली असून त्या तक्रारी नुसार विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आला असून या प्रकरणी तपास पोलीस निरीक्षक संजय सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार आनंद आचलेवार हे करत आहे...