घरकुल लाभार्थ्यांना वाळू कधी मिळणार

घरकुल लाभार्थ्यांना वाळू कधी मिळणार

महागाईच्या काळात घर कसे बांधायचे जनहित कल्याण संघटनेचा सवाल


रोहन आदेवार-मारेगाव 

मारेगांव तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये घरकुल मंजुर झालेले आहे. परंतु संबंधीत घरकुल धारकांना रेती मिळत नसल्याने त्यांचे बांधकाम बंद आहे. तसेच रोज सेतु केंद्राच्या लिंकवर चढलेला माल लंपास होत आहे. तसेच घरकुल धारक रोज सेतुमध्ये विचारणा केली असता त्यांना • उडवाउडवीचे उत्तर देतात व घरकुल धारक त्रस्त झालेले आहे. तरी वरील लिंकवर चढलेला माल कुठे जात आहे याची शहानिशा करावी व रोज लिंकवर किती माल चढत आहे याची माहीती देण्यात यावी अशी मागणी जनहित कल्याण संघटनेच्या वतीने तहसीलदार उत्तम निलावाड यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली असून यावेळी निवेदन देतानी
तालुका अध्यक्ष समिर कुळमेथे, तालुका उपाध्यक्ष राॅयल सय्यद, सचिव निलेश तेलंग, कपील कुळमेथे, गौरव आसेकर, अल्ताफ कुरेशी, गोलू डभारे, तुषार पवार, मोहीत गेडाम,तोलिद कुरेशी स्वप्निल तलाडे, पियुष पुनवटकर हे उपस्थित होते.
मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव यवतमाळ