अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त*महसूल विभागाची कारवाई

अवैध रेती वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर जप्त*
महसूल विभागाची कारवाई 

राळेगाव तालुका प्रतिनिधी 
लोकेश दिवे
9022793012

राळेगाव तालुक्यातील मौजा इचोरा  येथे अवैध रेती वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार यांना मिळाले असता त्यांनी संबंधित मंडळाधिकारी तसेच तलाठी यांना पाठवून आज दिं १४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी अवैध रेती ट्रॅक्टर वर कारवाई करून दंडात्मक कारवाई केली आहे.
 अवैधरित्या वाहतूक करणारे ट्रॅक्टर क्रमांक एम एच ३२पी पी ५६२१ गोपाळ राजेश राऊत तर ट्रॅक्टर क्रमांक एम एच ४० एल ८४५३ स्वप्निल बाबाराव भोयर यांचे मालकीचे असून हे ट्रॅक्टर अवैद्य रेती वाहतूक करीत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार यांना मिळाली असता मंडळ अधिकारी कणसे तलाठी सरतापे तलाठी ओमकार व तलाठी सौरभ तूमस्कर हे मौजा  इचोरा येथे जाऊन अवैद्य  रेती वाहतूक  ट्रॅक्टर जप्त केले असून सदर ट्रॅक्टरचा पंचनामा करून दंडात्मक कारवाई करण्यात आली व दोन्ही ट्रॅक्टर तहसील कार्यालयात जमा करण्यात आले आहे.