राळेगांव विधानसभा क्षेत्रात लवकरच होणार
तिसऱ्या समविचारी आघाडीची घोषणा .
लोकेश दिवे- राळेगाव
राळेगांव :- आज दिनांक २/९/२०२३ रोज शनिवारला शासकिय विश्रामगृह राळेगांव येथे एका आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यात गोंडवाना गणतंत्र पार्टी, वंचित बहुजन आघाडी आणि बिरसा ब्रिगेड समाज संघटना सामील होते. या तिनही पक्षाच्या वतीने ही सभा आयोजीत करण्यात आली होती. या सभेमध्ये प्रस्थापीत सत्ताधाऱ्यांच्या मनमानी कारभारला जनता त्रस्त झाल्यांमुळे सामान्य माणसांच्या समस्या सोडविण्याकरीता पं.समीती व जिल्हापरिषद निवडणूकीमध्ये आपल्या हक्काचे उमेदवार निवडून आणण्याकरीता या तिसऱ्या आघाडीची निर्मीती करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे या आघाडीमध्ये ज्या सामाजिक संघटनांना सहभागी व्हायचे असेल तर त्यांनी पक्ष प्रमुखाशी संपर्क साधून आघाडीत सहभागी व्हावे असे आव्हाहनही करण्यात आले गोंगपाचे कार्याध्यक्ष मा. बळवंत मडावी सर यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विकासभाऊ मुन, बिरसा ब्रिगेड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. अरविंद कुडमेथेसर, वंचित बहुजन आघाडी राळेगांव विधानसभा अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश फुलमाळीसर,
गोंगपाचे महीला आघाडी जिल्हा अध्यक्ष सौ. विजयाताई रोहणकर मॅडम, गोंगपा ओबीसी सेलचे अध्यक्ष विशालभाऊ वाघ, वं.ब.आ. जिल्हा उपाध्यक्ष धनराजजी लाकडेसर, व.ब. आ चे सुनिल ढोरे साहेब, गोंगपाचे तालुका अध्यक्ष सौ वर्षाताई आड़े, समीर कुमरे, नरेश येड़मे, विश्वनाथ मरस्कोल्हे, मोरेश्वर गेडाम, देविदास आत्राम, वसंत सोयाम, प्रा. वसंत कन्नकेसर, सुरज मरस्कोल्हे, उमेश येरमे, सतिश आहाडे, उमेश उईके, गजानन कुमरे, राजेंद्र कुमरे,
हर्षल आडे, निता कुळसंगे, कलावती उईके, जयश्री मसराम, मनिषा फुसनाके इत्यादी महीला व पुरुष कार्यकर्ते उपस्थीत होते.