राळेगाव येथे एमआयडीसी साठी राष्ट्रवादी आग्रही[ ना.धर्मराजबाबा आत्राम यांना तालुकाध्यक्ष बाळू धुमाळ यांनी दिले निवेदन]

राळेगाव येथे एमआयडीसी साठी राष्ट्रवादी आग्रही
[ ना.धर्मराजबाबा आत्राम यांना तालुकाध्यक्ष बाळू धुमाळ यांनी दिले निवेदन]


राळेगाव / प्रशांत भगत 

शेतकरी आत्महत्याग्रस्त राळेगाव तालुक्यात बेरोजगारीची समस्या देखील भीषण आहे. शेतीवर आधारित अर्थव्यवस्था असणारा हा कष्टकरी जनतेचा तालुका. या तालुक्यात उद्योगाची मुहूर्तमेढ व बेरोजगारीतुन मार्ग काढण्यासाठी एमआयडीसी दया अशी आग्रही मागणी राळेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस चे वतीने करण्यात आली. मंत्री धर्मराजबाबा आत्राम यांना राळेगाव तालुक्यातील सेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.
         राळेगाव तालुक्यात मोठे उद्योग निर्मित केंद्र नाही. त्यामुळे येथील तरुणांना उद्योगासाठी परजिल्ह्यात जावे लागते. यामुळे (ता. राळेगाव) येथील एमआयडीसी तत्काळ पूर्ण करावी, अशी मागणी तालुका अध्यक्ष बाळू धुमाळ यांनी केली आहे. अन्न औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराव बाबा आत्राम यांना याबाबत निवेदन दिले आहे. या बाबत धर्मराजबाबा आत्राम यांनी सलारात्मक भूमिका व्यक्त केली असून राष्ट्रवादी काँग्रेस हा कार्यकर्त्यांचा सन्मान करणारा पक्ष आहे. अजितदादा पवार यांचे नेतृत्वात जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करू अशी ग्वाही दिल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिली.
बॉक्स 
    राळेगाव तालुक्यात उच्च प्रतीचा कापूस उत्पादित होतो, मात्र कापूस पिकवणारा शेतकरी उपेक्षित आहे. त्या सोबतच बेरोजगारांच्या हाताला कामं नाही. इथली मुलं पुण्या -मुंबई कडे रोजगाराच्या शोधात वनवणं भटकत असतात. कोरोना काळात मला स्वतः या बेरोजगार युवकांच्या एकूण आर्थिक, सामाजिक स्थिती चा विदारक अनुभव आला.राळेगाव तालुक्यात मोठे उद्योग निर्मिती केंद्र असणे काळाची गरज आहे. या अभावी भागाची प्रगती रखडली आहे.  याला आळा बसण्यासाठी व या भागाचा विकास होण्यासाठी सध्या  एमआयडीसी होणे गरजेचे आहे. 
या भागात निर्माण होत असलेले राष्ट्रीय महामार्गाचे जाळे या एमआयडीसीला पूरक ठरतील . त्यामुळे राळेगाव एमआयडीसीचा प्रश्न तत्काळ मार्गी लावण्याची मागणी अन्न औषध प्रशासन मंत्री राजे धर्मराज आत्राम यांचे कडे केली.
             *शशिकांत उर्फ बाळू धुमाळ*
   तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, राळेगाव