माता नगर येथील रोडसाठी आमदार डॉ अशोक उईके यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त
{आमदार निधीतून शहरात विविध विकास कामे सुरू}
राळेगाव /प्रशांत भगत :-
*राळेगाव शहरांतील मातानगर येथील करमरकर आरामशीन ते वडकी रोडला टच या रोडसाठी राळेगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ अशोक उईके यांनी दीड कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यामुळे या रोडचे काम लवकरच सुरू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन राऊत यांनी सांगितले आहे*.
माता नगर येथील रोडच्या कामाची मोजणी व लेवलींग घेण्यात आली त्वरीत निवीदा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने काढण्यात येणार आहे त्यामुळे लवकरच या कामाला सुरुवात होणार आहे. दीड कोटी रुपयात पुर्ण रोड होत नसेल तर पुन्हा निधि देण्याचे आश्वासन आमदार डॉ अशोक उईके यांनी दिले आहे. रोडच्या कामाचे मोजमाप करतेवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता नितीन राऊत सिव्हील इंजिनिअर रोहित लाकडे नगर पंचायतचे बांधकाम सभापती मंगेश राऊत, नगर सेवक डॉ संतोष कोकुलवार, दिलीप दुधलीकर, माजी सरपंच सुधाकर गेडाम, माजी नगरसेवक किशोर जूनूनकर, महेश भोयर,जिवन रामगडे, नितीन मुडे व माता नगर येथील नागरीक उपस्थीत होते. यावेळी मातानगर येथील नागरिकांनी आमदार यांचे आभार सुध्दा मानले आहे. शहरातील विकास करण्यासाठीं आमदार डॉ अशोक उईके यांनी कोटी रुपयांचा निधी दिला आहे त्यातले काही कामे सुरूही झाले असुन काही कामे लवकरच सुरू होणार असल्याची माहिती किशोर जूनूनकर यांनी दिली आहे.
बॉक्स......
नगर पंचायत मध्ये भाजपचा एकही नगर सेवक नसला तरीही शहरातील जनतेनी मला शहराचा विकास करण्यासाठीं निवडून दिले आहे त्यामुळे राळेगाव शहरातील व तालुक्यातील विकास कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आमदार डॉ. अशोक उईके यांनी सांगितले आहे