वैद्यकीय व्यवसाया च्या मागे कमिशन चा काळा बाजार आरोग्य प्रशासनाचे दुर्लक्ष
रुग्णांची होत आहे मोठ्या प्रमाणात लूट
अन्न व औषध प्रशासन नागपूर विभागाचे दुर्लक्ष
कैलास साठवणे-बेला
बेला ; उमरेड तालुक्यात सर्वात मोठे गाव म्हणजे बेला येथे वीस ते पंचवीस हजार लोकवस्ती असून बेला गावाला लागून चाळीस ते पन्नास खेडे गाव आहे गाव खेड्यातल्या लोकांसाठी मोठी बाजारपेठ म्हणजे बेला , शिक्षणा पासून वैद्यकीय सेवेसाठी बेला तर भाजी मंडी पासून कापड किराणा पर्यंत खेडे गावातील लोक बेला गावात येतात बेला गावापासून काही अंतरावर आदिवासी दुर्गम भाग आहे तसेच गावाला 4 ते 5 कि मी अंतरावर मानस ऍग्रो लिमिटेड कारखाना व आयडियल पावार प्लांट ची निर्मिती केली आहे येथे काम करणारे बाहेर प्रांतातील मजूर तसेच आजूबाजुच्या खेड्यातील व बेला गावातील लोकांना बेला बाजारपेठ मध्ये मूलभूत सुविधेसाठी यावे लागतात त्या पैकी बेला गावात वैद्यकीय व्यवसाय व मेडिकल स्टोर्स खूप सारे आहे . पण कामाचे नाही असे प्रतिनिधी ने सर्वे केल्यास माहिती पडले ,,,वैद्यकीय व्यवसायात खूप मोठे कॉम्पिटीशन असून रुग्णाची पिळवणूक होत असून त्यांना जेनेरिक तसेच पीसीडी कंपनी कमिशन घेऊन लिहून देणाऱ्या ड्रॉक्टर चे प्रमाण खूप सारे आहे . तसेच विना डिग्री चे ड्रॉ . खूप सारे असून रुग्णांच्या जीवनाशी खेळत आहे प्रशासनाने प्रत्येक ड्रॉ ची डिग्री तपासून घ्यावी कारण यांनी खूप गाव डोक्यावर घेतला असून अमाप संपत्ती गोळा केली आहे यात विना डिग्री प्रॅक्टिस करणारे डॉ . स्वतःला एम डी समजतात कारण गावखेड्यातील लोकांना दवाई बद्दल अपुरी माहिती असतात . मोठ्या विश्वासाने देवाचे दुसरे रूप म्हणून रुग्ण डॉ कडे जातात पण रुग्णांना प्रथम स्टेज मध्ये लोकल कंपनीची दवाई देऊन आराम होत नाही ड्रॉ दवाई नागपूर वरून खरेदी करून आणतात आणि स्वतः रुग्णांना जास्त दारात विकतात या वर निर्बंध आणणे गरजेचे आहे व सेकंड स्टेज मध्ये दुसऱ्यांदा रुग्ण त्याच ड्रॉ कडे गेला तर तो ड्रॉ हाथ वर करून देते व त्या रुग्णांना नागपूर ला चेकअप करण्याकरिता पाठवले जातात . यात गरीब रुग्णांची खूप लूट होत असते अश्या ड्रॉ वर आरोग्य प्रशासनाने योग्य चौकशी करून कारवाही करावी असे गावकऱ्यांची मागणी आहे .
बेला गावात 15 मेडिकल स्टोर्स आहे पण विना परवाना धारक दुकाने सर्रास सुरू असतात मेडिकल मध्ये दहावी बारावी झालेले मुले रुग्णांना दवाई काढून देतात तीन ते चार ड्रॉ ने आपले स्वतःचे मेडिकल सुरू केले असून असल्या मेडिकल मध्ये कोणीही फार्मासिस्ट बसत नाही या वर प्रशासनाचे लक्ष नाही तसेच रुग्णांना लोकल दर्जाची दवाई देतात. व रुग्णांना प्रिस्क्रिप्सशन घेऊन स्वतःच्या मेडिकल मध्ये जबरदस्तीने हाथ पकडून ड्रॉ नेतात लोकल दर्जा ची दवाई लिहून देऊन रुग्णाकडून जास्त पैसे उखरतात त्या दुकानात विना प्रिक्रिपशन सर्व प्रकारची सर्व दवाई मिळतात झोपेच्या गोळ्या पासून सेक्श च्या गोळ्यापर्यंत असल्या केमिस्ट वर कारवाही करणे गरजेचे आहे असे गावातील जनतेला वाटते जर यांच्या वर कारवाही झाली नाही बेला गावातील जनता रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही तसेच कमिशन च्या लोभापायी वैद्यकीय व्यवसाय तुच्छ दर्जा प्राप्त झाला आहे . ड्रॉ स्वतः पैसे कंपनी वाल्या कडून व रुग्णांनची लूट करत आहे करीत अन्न व औषध प्रशासन नागपूर विभाग यांनी दखल घ्यावी