ढिवर- समजाची एकता हा मोठा परिवर्तन घडवेल प्रसिद्ध हृदय तज्ञ डॉ. अविनाश नान्हे यांचे प्रतिपादन
भंडारा जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकावर लोकसंख्या असलेल्या ढिवर समाज हा सामाजिक, शैक्षणिक ,राजकीय व आथिँक द्रुष्टीने अत्यंत दुबँल असा समाज आहे. त्याची अवस्था अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीपेक्षाही अत्यंत दयनीय असून देशाला स्वातंत्र्य मिळुनही 75 वषेँ पेक्षा अधिक कालावधी झाल्यानंतरही हा समाज शासकीय सोयी सुविधापासून वंचित राहिलेला आहे.सन 1974 ला हा समाजाला मत्स्य महषिँ स्व. जतिरामजी बवेँ माजी खासदार यांचे पुढाकाराने भटक्या जमातीचे आरक्षण मिळाले.या समाजातील तत्सम जातींना भटक्या जमातीच्या आरक्षण सुचित समावेश करण्यात आला.त्यामुळे थोड्या काही प्रमाणात शैक्षणिक प्रवाहात हा समाज आला.व काही प्रमाणात प्रशासकीय सेवेत आहे. परंतु केंद्र सरकारच्या आरक्षण सुचित या समाजाचा समावेश करण्यात आला नसल्यामुळे केद्र सरकारच्या अनेक सोयीसुविधा पासून हा समाज वंचितच आहे. परंपरागत मत्स्य व्यवसायात हा समाज गुरफटलेला असल्यामुळे मासेमारी या व्यवसायात हा समाज प्रामुख्याने दिसतो.ज्या उद्देशासाठी भटक्या जमातीचे आरक्षण या समाजाला मिळाले,त्याचा लाभ या समाजाला लोकसंख्याच्या प्रमाणात अद्यापही घेता आला नाही.त्यामुळे शैक्षणिक जाणीव जागृतीच्या अभावी सामाजिक,शैक्षणिक ,राजकीय द्रष्टीने या समाजात आमुलाग्र परिवतँन घडून आले नाही.शैक्षणिक जाणीवजाग्रतीच्या अभावी हा समाज मागे असल्यामुळे या समाजातील समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत शैक्षणिक,सामाजिक ,व्यावसायिक जाणीव जाग्रुती करण्यासाठी *युवा कार्यकर्तांनी समाजबांधणी कशी करायची ?समाजाचे प्रश्न कसे सोडवायचे? समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी परिपक्व कार्यकर्ता म्हणून काय जबाबदारी घ्यायची ?शासकीय योजनांचा लाभ समाजातील घटकांना कसा मिळवून द्यायचा? आणि गांव तिथे एकलव्य सेना स्थापन करुन शैक्षणिक,सामाजिक,व राजकीय जनजागृती कशी करायची?* या उद्दिष्टेपूतीँसाठी दोन दिवसीय कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे रावणवाडी ता.जि.भंडारा येथे आयोजन करण्यात आले.
या दोन दिवसीय निवासी कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन श्री.के.एन.नान्हे सर यांचे अध्यक्षतेखाली व डाँ.अविनाश नान्हे ह्रदयरोग व मधुमेह तज्ञ यांचे शुभहस्ते पार पाडण्यात आला.
त्यावेळी मंचावर प्रमुख अतिथी जनार्धन खेडकर
मुख्यसंघटक,सौ.अनिता भुरे जि.प.सदस्या, श्री. प्रकाश डायरे उपसंचालक वैधानिक विकास मंडळ,प्रा.डाँ.मुरलीधर भानारकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,प्रा.डाँ.योगेश दुधपचारे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,श्री.दिनानाथजी वाघमारे संयोजक संघर्ष वाहिनी नागपूर,प्राचार्य शरद सतदेवे हे उपस्थित होते..सर्वप्रथम वीर धनुधँर एकलव्य व मत्स्य महषिँ स्व.जतिरामजी बवेँ यांचे प्रतिमेला मालार्पन व दिप प्रज्वलित करुन शिबिराचे उद्घाटन करण्यात आले
या दोन दिवसीय पार पडलेल्या शिबिरात तज्ञ मार्गदर्शक प्रा.डाँ.श्री.मुरलीधर भानारकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर *समाजबांधव बांधणीसाठी प्रचार आणि प्रसार कसे करायचे* ?यावर विस्तृत असे व्याख्यान आपले ओजस्वी भाषण शैलीत करुन कार्यकर्तामध्ये नवा जोश निमाँण केला .
प्रा.डाँ.योगेश दुधपचारे गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी *ढिवर-भोई समाजाचा इतिहास- आव्हाने व त्यावरील उपाय* या विषयावर व्याख्यान देवून हजारो वषँआधीचा ढिवर-भोई समाजाची तत्कालीन व आजची स्थिती यावर विविध इतिहास प्रवाहाचा विविध संदभँ देवून उलगडा केला आणि *ढिवर समाजाचे आरक्षणाचे प्रश्न व उपाय* यावर सर्व कार्यकर्तामध्ये ढिवर समाजाला केद्र सरकारच्या आरक्षणाची गरज का ? याचे विविध संदभँ देवून आरक्षण मिळविण्यासाठी सवँ समाजाने एकत्रित लढा देण्याचे आव्हान या शिबिरात केले.
श्री.दिनानाथजी वाघमारे संघषँ वाहिनी यांनी *ढिवर-भोई समाजातील सामाजिक आथिँक,शैक्षणिक ,राजकीय व सांस्कृतिक क्षेत्रातील सध्याची स्थिती ,आव्हाने व त्यावर उपाय* यावर विविध शासकीय आकडे प्रस्तुत करुन ढिवर-भोई समाजाचे स्थान किती खालच्या पातळीवर आहे याची आकडेवारी प्रस्तुत करुन प्रशिक्षणाथीँ यांना बोलते केले.
श्री.प्रकाश डायरे माजी उपसंचालक वैधानिक विकास मंडळ यांनी *भोई समाजामध्ये सामाजिक व राजकीय नेत्रुत्व निर्माण करणे* या विषयावर व्याख्यान देतांना समाजाला नेतृत्वाची कशी गरज आहे,याचे विविध दाखले देवून नवी जाग्रुती करण्याचे आव्हान प्रशिक्षणाथीँ यांना केले.
प्राचार्य श्री.शरद सतदेवे यांनी *संघटनात्मक वक्तृत्व कलेचा विकास,भाषण व संभाषण कला कशी विकसित करायची*? याबाबत केलेल्या व्याख्यानातून विविध संदभँ देवून कार्यकर्तेमध्ये त्याच्यातील सुप्त कलागुणांना जाग्रुत केले
या शिबिराचे समारोप प्रसंगी तज्ञ मागँदशँक म्हणून लाभलेले *श्री.प्रकाश डायरे* माजी उपसंचालक वैधानिक विकास मंडळ
*प्रा.डाँ.मुरलीधर भानारकर* शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर,*प्रा.डा. योगेश दुधपचारे* गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,*श्री.दिनानाथजी वाघमारे* संयोजक संघषँ वाहिनी,*श्री.उमेश कोराम नागपूर* *श्री.शरद सतदेवे प्राचार्य* जि.प.ज्युनिअर काँलेज आंधळगांव यांना शाल,श्रीफळ व मानचिन्ह देवून आयोजन समितीच्या वतीने प्रा.के.एन.नान्हे संस्थापक एकलव्य सेना यांचेद्वारा सन्मानित करण्यात आले
तसेच उत्कृष्ट प्रशिक्षणार्थी श्री. संजय मारबते बेला ,सचिन मेश्राम सिरसघाट दिपक सतदेवे सालेबडीँ,अमित शहारे बेला,भिकाजी मेश्राम कोथुनाँ,राजकुमार ठाकरे मोहदुरा,प्यारेलाल केवट बेलगांव यांची निवड करण्यात येवून यांना प्रशस्तीपत्र देवून त्यांचा गौरव करण्यात आला.
प्रशिक्षण वगाँत दिलेल्या अमुल्य सहयोगाबद्ल श्री.पुरुषोत्तम मडामे गणेशपूर,श्री दिघोरे वाकेश्वर यांचा शाल,श्रीफळ व सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले
या प्रशिक्षणाच्या यशस्वीतेसाठी
ज्यांनी तनमनधनाने खुप मेहनत घेतली.त्यातील नियोजन समितीचे सदस्य *श्री.अनिल दिघोरे अध्यक्ष,श्री.सुरेश खंगार सदस्य,श्री.संजीव भुरे सदस्य,श्री.सुभाष उके सदस्य,श्रीमती अनिता भुरे सदस्य,श्री.प्रविण मडामे सदस्य,श्री.रवि उके सदस्य,श्री.बाबुलाल भोयर सदस्य,श्री.मनिराम नान्हे सदस्य श्री.शिवशंकर मांढरे सदस्य* यांचा श्री जनार्धन खेडकर मुख्यसंघटक एकलव्य सेना यांचे शुभहस्ते यथोचित पुष्पगुच्छ देवून गौरव करण्यात आला.
या दोन दिवसीय चाललेल्या प्रशिक्षण स्थळी श्री.डाँ.रामकृष्ण शिंदे,श्री.टेकचंद मारबते ,श्री.दशरथ मांढरे,श्री.राहुल पडाळ यवतमाळ,श्री.अरुण नान्हे,श्री.सुनील वाघधरे,श्री.विष्णू चाचेरे लाखनी,श्री.डाँ.माधवन मानकर,श्री.मनोज केवट
श्री गिरीधर भोयर,श्री.गोविंद मखरे यांनी भेटी देवून प्रशिक्षणाथीँ यांना शुभेच्छा दिल्या.
दोन दिवसीय कायँक्रमाचे यशस्वी नियोजन श्री.अनिल दिघोरे,श्री.सुरेश खंगार,श्री.संजीव भुरे,श्री सुभाष उके यांनी केले.
या कार्यक्रमाचे स्थळी डाँ.अविनाश नान्हे यांनी *वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन* केले होते त्याचा लाभ सवँ प्रशिक्षणाथीँ यांनी घेतला..निवासी कायँक्रमाची व्यवस्था व भोजनव्यवस्था वाखाणण्याजोगे होते..सवाँचे आभार मानून प्रशिक्षणाथीँ यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
............................................