आकाश चंदनखेडे राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ विधानसभा अध्यक्ष पदी
---------------------------------------------
राजू चव्हाण- घाटंजी
घाटंजी - राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ विधानसभा अध्यक्ष पदी आकाश चंदनखेडे यांची निवड करण्यात आली हाऊसिंग फायनस कार्यालय यवतमाळ येथे झालेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या जिल्हा स्तरीय मीटिंग मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सुरजदादा चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेस नेते आमदार इंद्रनील नाईक, जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कामारकर पाटील यांच्या मान्यतेने जिल्हा मध्यवर्ती बँक चे प्रभारी अध्यक्ष वसंतराव घुईखेडकर यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले आकाश चंदनखेडे धानोरा (वड) ग्रामपंचायत चे विद्यमान सदस्य आहेत त्यांनी यापूर्वी संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेत जिल्हा संघटक, जिल्हा सचिव अशा विविध पदावर त्यांनी काम केले आहे.यवतमाळ विधानसभा मध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी ला आकाश चंदनखेडे यांच्या नेतृत्वाखाली पक्ष अधिक मजबूत आणि बळकट होईल असा विश्वास आमदार उपस्थित नेत्यांनी व्यक्त केला . जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आदरणीय अजितदादा पवार यांचा विचारानुसार पुढील काळात पक्ष संघटना साठी भरीव काम करून सर्वसामान्य जनतेसाठी काम करण्याची इच्छा आकाश चंदनखेडे यांनी व्यक्त केली. यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस चे जिल्हा कार्याध्यक्ष तारीकभाई लोखंडवाला, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या क्रांतीताई राऊत (धोटे),राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष योगेश धानोरकर ,यवतमाळ शहर अध्यक्ष लाला राऊत,जेष्ठ नेते उत्तमराव गुल्हाने तन्मय त्रिवेदी,नयन लुंगे,अमित वगारहांडे ,विभाष कोटनाके, सोमेश पंडिले,अमित नारसे,महेंद्र अडसड निलेश राठोड, देवानंद शेंडे,शैलेश भिसनकर,आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.असे त्यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.