आमडी येथिल आर. सी .यु.हायस्कूल मध्ये सेवा पुर्ती निमित्य निरोप..
राजू चव्हाण- घाटंजी
घाटंजी - आमडी येथील आर. सी. यु. हायस्कुल येथील श्री. अनिल पद्मावार हे तब्बल तीस वर्षे सलग सेवा बजावित मुख्याध्यापक पदावरून ३१ जुलैला नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले. या निमित्ताने संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या निरोप समारंभात त्यांना सेवापुर्ती निमित्य निरोप देण्यात आला .या आयोजित
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष श्री. शरद उपलेंचवार तर प्रमुख अतिथी म्हणून सौ. निलीमामाई उपलेंचवार, सौ. मनिषा अनिल पद्मावार, सर्वेश अनिल पद्मावार हे होते.
या संस्थेसाठी श्री अनिल पद्मावार सरांनी जे योगदान दिले आहे ते निस्वार्थ भावनेने, विद्यार्थ्यां प्रती भक्ती भावनेने प्रेरीत होऊन अविरत तीस वर्षे सेवा प्रदान केली, संस्था नावारूपास आणण्यास श्री पद्मावार सरांचा मोलाचाच नव्हे तर सिंहाचा वाटा आहे, अनेक बिकट परिस्थितीत या संस्थेला नावारूपास आणली याचे श्रेय्य पद्मावार सर यानाच जाते असे गौरवोद्गार श्री शरद भाऊ उपलेंचवार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून व्यक्त केले. यावेळी
प्रतिक्रिया देण्यासाठी उपस्थित असलेल्याला सौ. मनिषा पद्मावार यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना एक संघर्षशिल व्यक्तीमत्व, उत्तम संघटक, कुशल नेतृत्व असणारे, समाजाभिमुख व्यक्तीमत्व मला माझ्या आयुष्यासाठी लाभले हे माझे अहोभाग्य आहे, मला या गोष्टीचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा सार्थ अभिमान आहे अशा शब्दात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. कार्यकमाचे सुत्रसंचलन सौ. पुष्पाताई शेंडे यांनी केले,याप्रसंगी श्री. भाष्करवार सर, श्री. डंभारे सर, श्री. जाधव सर, श्री. जांभुळे सर, श्री. येरावार सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यकमाचे आभार श्री जांभुळे सर यांनी मानले.