मेमन कॉलनी भोसा जि. प. उर्दू शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न

मेमन कॉलनी भोसा जि. प. उर्दू शाळेत ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न
-----------------------------------------------
 समाजसेविका नंदाताई भिवगडे यांचे हस्ते ध्वजारोहण
----------------------------------------------- 

राजू चव्हाण- घाटंजी

घाटंजी - १५ ऑगस्ट २०२३ रोज मंगळवारला मेमन कॉलनी भोसा येथिल जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेत मोठ्या हर्षोल्लासात स्वतंत्रता दिवसाच्या समोराहाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रीय ध्वजारोहण करून करण्यात आले.या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेल्या सामाजिक कार्यकर्त्या तथा शिवसेना (बा.उ.ठा.) च्या नंदाताई भिवगडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.त्यांनी यावेळी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना संबोधित केले.आणि स्वतंत्रता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणाचे अवलोकन करण्यात आले. विद्यार्थ्यातील शिस्त बद्धता  पाहून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले.शाळेतील गणमान्य शिक्षिका यांनी स्वतंत्रता दिवसावर विचार मांडले.आणि उपस्थित मान्यवर, प्रमुख पाहुणे,पालकांचे आभार मानले.त्यानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुण्या नंदाताई भीवगडे,शाळेच्या मुख्याध्यापिका शमा परवीन, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमन खा पठाण, उपाध्यक्ष जफर खान,पालक शिक्षक संघाचे अक्रम खान,अमिना बानो शेख दस्तगीर, सायमा परवीन, इफ्तेखार खान, अमजत खान, शेख खान, सय्यद नईम, मोहंमद अस्लम यांचे सह बबलू शेख, फारुख, अनिकेत चौधरी, भुषण काळे, विशाल भिवगडे तथा मेमन कॉलनी येथील नागरिक व पालक वर्ग उपस्थित राहून मोठ्या उस्ताहात कार्यक्रम साजरा करण्यात आला.
          ---------------