शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची चाचणी बंधनकारक

शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांची चाचणी बंधनकारक

  
 

 जिल्ह्यातील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग तसेच विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालये,तंत्रनिकेतन व तत्सम शैक्षणिक संस्थांमधील नियमित वर्ग आज 1 फेब्रुवारीपासून प्रत्यक्षरीत्या सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी वाशीम यांनी दिले आहे.या आदेशात सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी 31 जानेवारीपर्यंत आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते.


जिल्हाधिकारी यांच्या 1 फेब्रुवारीच्या आदेशात जिल्ह्यातील संबंधित शाळा, महाविद्यालये, तंत्रनिकेतन व तत्सम शैक्षणिक संस्थेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी आता 5 फेब्रुवारीपर्यंत आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयातील लसीकरणासाठी पात्र असतील त्यांचे लसीकरण करावे तसेच आरटी-पीसीआर चाचणी करण्याची आवश्यक ती कार्यवाही करण्याचे या आदेशात नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या