ओला दुष्काळ जाहिर करा ' गाव तेथे शेतकरी अधिवेशन* वंचित बहुजन आघाडीचा अनोखा उपक्रम

ओला दुष्काळ जाहिर करा ' गाव तेथे शेतकरी अधिवेशन वंचित बहुजन आघाडीचा अनोखा उपक्रम

प्रतीनिधी:-घाटजी


सततचा दुष्काळ व नापीकिमूळे शेतकरी त्रस्त झाला आहे. गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी सततचा पाऊस,अतिवृष्टी व महापुरमूळे शेतकार्यांचे कंबरडेच मोडले आहे. यासाठी शेतकार्यांना दिलासा मिळावा यादृष्टीने वंचित बहुजन आघाडीनेओला दुष्काळ जाहिर करा यासाठी दि. २८ सप्टेंबर २०२१ रोजी शेतकर्यांसाठी विशेष अधिवेशन घेवुन त्यांच्या समस्या निवारण कराव्या अशी मागणी मा. मुख्यमंत्री यांना केली होती परंतू शासनाने अधिवेशन घेतले नसुन शेतकर्यांसाठी कोणत्याही प्रकारची घोषना केलेले नाही . आज हवालदिल झालेला शेतकरी सरकार कडे अपेक्षेने डोळे लावुन बसला आहे.  म्हणून वंचित बहुजण आघाडीने व गोंडवाना संग्राम परिषद शेतकर्यांच्या व्यथा वेदना सरकार दरबारी पोहचवण्यासाठी शेतकर्यांकडून शेतकर्यांसाठी *गाव तेथे शेतकरी विशेष  अधिवेशन अभियान* संपुर्ण घाटंजी तालूक्यामध्ये राबवण्यात येणार आहे. या अधिवेशनाचे उदघाटन शाहिद (आत्महत्याग्रस्त )शेतकरी यांच्या पत्नी अल्काताई शंकर चायरे यांच्या हस्ते मशाल पेटवून करण्यात आले अध्यक्ष आकाश हांडे, शंकर येलादे, राजू सोयाम,प्रशांत देठे,अजय खोब्रागडे, वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संघपाल कांबळे,नितीन राठोड,तुकाराम कोरवते,मनोज मुनेश्वर, सचिन राठोड, यशवंत भगत, राहुल नगराळे,हर्षे,मधुभाऊ लेनगुरे,रवी चौधरी, मोहन मेश्राम, आकाश पेंदोर,सिद्धांत जिवने,रा. वि. नगराळे,विनायक नगराळे, केशव डेहनकर,व गावातली शेतकरी उपस्थित होते.अधिवेशनात विविध ठाराव पारित करुन सरकार दरबारी मांडण्यात येत आहे.
 *शेतकरी अधिवेशन ठराव* 1)विधीमंडळाचे विशेष शेतकरी अधिवेशन घेउन शेतकर्याचे प्रश्न मार्गी लावण्यात यावे . 2)घाटंजी तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करून रु. 50,000 /- दर हेक्टरी देण्यात यावी. 2)पिकांची 62% आनेवारी रद्द करुन परिस्थीथी निहाय वास्तव आनेवारी जाहिर करावी . 4) सततचा पावसामुळे कापूस व  सोयाबीन या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देवून नुकसान भरपायीत्वरित देण्यात यावी .                  5) शेत्कर्यांचे शेती उत्पाद्क्ता वाढवण्यासाठी मागेल त्याला विहिर , विज पुरवठा व शेतात जाण्यासाठी रस्ता ही मोहीम राबवण्यात यावी . 6)सोयाबीन , कापूस व अन्य पिके यांची  विमा रक्कम त्वरित देण्यात यावी . 7) छत्रपती शिवाजी महराज शेतकरी सन्मान योजना 2017 या योजनेअंतरगत  सं 2009-ते 2016 पर्यंतची कर्ज माफी पूर्णता निकालात काढावी .8)शेतकर्यांना नियमित विज पुरवठा देऊन , शेतकर्यांचे विज बिल माफ करुन विज पुरवठा खंडीत करण्याची मोहीम थांबवण्यात यावी 9)केंद्र सरकारने शेतकरी विरोधी तिन कृषी विधेयके पारित केली ते रद्द करन्यात यावी. 10)वन्य प्रान्यापासून होणार्या शेतीच्या पिकांची नुकसान भरपाई तात्काळ द्या.11)शेतकर्यांचा शेतमाल हमी भावापेक्षा कमी भावानेखरेदी करनार्यांवर  गुन्हे दाखल करन्यात यावे. 12) पी.एम. शेतकरी पेन्शन योजना संपुर्ण  शेतकर्यांपर्यंत कार्यन्वित करा.