दिग्रस येथे कायदेविषयक जनजागृती रॅलीला लाभले उत्स्फूर्त प्रतिसाद
दिग्रस :-प्रतिनिधी
दिग्रस येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय व तालुका विधी सेवा समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या " कायदेविषयक जनजागृती रॅलीला " उत्स्फूर्त प्रतिसाद लाभले . यावेळी न्यायाधीश , वकील , पोलीस व विविध शासकीय विभागाचे अधिकारी , कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .
दिग्रसचे दिवाणी न्यायाधीश स्वप्नील रामटेके यांनी सदर रॅलीचे व कायदेविषयक जनजागृती अभियानाचे न्यायालय परिसरात उद्घाटन केले . सह-दिवाणी न्यायाधीश नितीन ढोके , तालुका विधी सेवा समितीचे पदसिध्द सचिव व गटविकास अधिकारी रमेश खारोडे , वकील संघाचे अध्यक्ष ऍड केशव वानखडे , सचिव ऍड इरफान नौरंगाबादे , पोलीस निरीक्षक सोनाजी आमले , गटशिक्षणाधिकारी मुकेश कोंडावर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते . यावेळी अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले . प्रा मतीन खान यांनी सूत्रसंचालन केले , तर ऍड के जी देशपांडे यांनी आभार मानले .
शहरातील मुख्य मार्ग व चौकात फेरी मारल्यानंतर सदर जनजागृती रॅलीचा समारोप न्यायालयाच्या आवारात झाला . दिग्रस तालुका वकील संघाचे उपाध्यक्ष ऍड अमीन कादरी , सहसचिव ऍड ज्योतीसिंह चव्हाण , कोषाध्यक्ष ऍड गिरीष दळवी , ऍड राजकुमार राठोड , ऍड दिलीप राठोड , ऍड बी जी देशपांडे , ऍड जावेद शेख , ऍड विजय राठोड , ऍड अजय पवार , ऍड शंकर हटकर , ऍड व्ही जी शिंदे , ऍड मोहसिन मिर्जा , अंगणवाडी पर्यवेक्षक व सेविका , जिल्हा परिषद शिक्षक , पोलीस कर्मचारी , असंख्य वकील , न्यायालयाचे कर्मचारी आदी मान्यवर यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते .
फोटो