महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात "तिरडी आंदोलन " डफळे ,भजन घोषणा देत काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा

महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात 
"तिरडी आंदोलन "

 डफळे ,भजन  घोषणा देत काढली प्रतीकात्मक अंत्ययात्रा 

प्रतिनिधी/ झरी
 

 तालुक्यातील मागील चार महिन्या पासून वीज अनियमित पुरवठा  मुळे संपूर्ण नागरिक त्रस्त आहेत . अवाजवी अवाच्या सव्वा बिले,बोगस मीटर रिडींग,अश्या अनेक तक्रारी करून संपूर्ण नागरिक हैराण झाले आहे . बोगस कारभाराविरोधात जनतेनी तक्रारी करून  कोणतेही दखल घेतल्या गेली नसल्याने  तालुक्यातील युवा सामजिक कार्यकर्ते मंगेश पाचभाई यांच्या नेतृत्वात  सोमवार  २७ सप्टेंबरला     मुकुटबन  येथील बस स्टॅड पासून  ते  महवितरणच्या   मोर्चा नेण्यात आला .निषेध व्यक्त  महावितरणच्या भोंगळ कारभाराविरोधात प्रतीकात्मक अंतयात्रा काढून विरोध व्यक्त करण्यात आला वारंवार तक्रारी करून  दखल घेत नसल्याने झोपेचे सोंग घेतलेल्या  महावितरणच्या अधिका-यांना जागे करण्याकरिता डफडे ,भजन व घोषणा च्या गर्जना करण्यात आल्या .झरी तालुक्यातील मुकुटबन गावाचा औद्योगिक विकास सुरु असून आता शहरात रूपांतर होत आहे.  मुकुटबंन ला बिल भरणा केंद्र,बिल दुरुस्ती केंद्र,विद्युत पुरवठा सुरळीत करणे ,अडेगाव येथील 132 kv केंद्रच काम त्वरित करणे,बिले दुरुस्ती करणे,बोगस रिडींग घेणाऱ्यावर कारवाही करणे,अश्या अनेक मागण्या चे निवेदन देण्यात आले . तालुक्यातील अनेक गावातील  सरपंच  व  अनेक गावातील   असंख्य लोक आंदोलनात सहभागी झालेले पाहयला मिळाले . मुकुटबचे ठाणेदार अजित जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता .