घाटजी बस स्थानकात चालक व वाहकाच्या कपड्यांसह बॅगची चोरी;
चोरट्यास एक तासात पोलिसांनी केले जेरबंद
घाटजी बस स्थानकावर यवतमाळ डेपोची बस क्रंमाक एम एच ०७-९४३७ रात्रीला हलटीगं असल्याने ड्रायवर कंडक्टर कुमरे आणी सीडाम बस स्थानकाच्या रुममध्ये रात्रीला विश्रांती घेत असताना रात्री सुमारे दीड च्या दरम्यान एका चोरट्यांनी चक्क ड्रायवर कंडक्टर ची ब्याग खाकी वर्दी व तिकीट फाडन्याची मशिन चोरून नेली व कपड्या मधील पैश्याचे पाकेट त्यामध्ये असलेले महत्त्वाची कागदपत्रे असलेल्या पाकीट मधून फक्त ९०० रुपये रोख रक्कम लंपास करुन बस स्थानकाच्या बाहेर मशीन व कपडे फेकून दीले होते.ही घटना सीसी टीव्हीच्या कॅमेर्यात कैद झाली असल्याने फुटेज मध्ये पाठमोरा दीसणारा चोरटा हा गजानन हीरालाल राठोड रा, शिवपुरी तालुका कळम हा असल्याचे निष्पन्न होताच त्यास घाटंजी पोलीसांनी केवळ एका तासात जेरबंद करून गजाआड केले आहे.